बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तालिबानमध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबरदारी ‘या’ संघटनेने स्वीकारली!

काबूल | अमेरिकन आणि नाटोच्या सैन्याने अफगाणिस्तानमधून माघार घेतल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन केली. अमेरिकेच्या सैन्याचे अखेरच्या विमानाने अफगाणिस्तानमधून 30 ऑगस्ट रोजी उड्डाण केलं. त्यानंतर तालिबानमध्ये अनेक छोट्या मोठ्या घटना घडल्या. अलिकडेच दहशवाद्यांनी अफगाणिस्तानमध्ये हल्ला केला आणि त्या हल्ल्यात 8 लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती.

दोन दिवसांपुर्वी अफगाणिस्तानमधील जलालबाद येथील तालिबानच्या सुरक्षा वाहनांच्या ताफ्यांवर हल्ला झाला होता. भुसुरूंगाद्वारे तालिबानी लष्करी वाहने उडवून दिली होती. त्यामध्ये 8 लोकांचा मृत्यृ झाला होता. या हल्ल्यामागे इस्लामिक स्टेटचाच हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. आज ‘अमाक न्यूज एजन्सीने’ दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकारली आहे. त्यामुळे आता कट्टरवादी संघटनांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये आणखीनच वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता हस्तगत केल्यानंतर तेथील महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अफगाणिस्तानमधील महिलांनी घरातच बसावं. त्याचबरोबर ज्या महिलांच्या जागावर पुरूषांना नियुक्त केलं जाणार नाही.  त्या जागेवर महिलांना परवानगी देण्यात येणार आहे, असं तालिबानच्या नव्या मंत्रिमंडळातील महापौर हमदुल्ला नमोनी यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यात अफगाणिस्तानमध्ये अनेक दहशतवादी हल्ले होत आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानमधील लोकांना मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहे.

थोडक्यात बातम्या-

मीडियाची मदत घेत सोमय्या खोटे आरोप करत…’; मनिषा कायंदेंचा सोमय्यांवर घणाघात

भाजपने ‘ती’ प्रथा मोडली, थोरांतांनी करून दिली प्रमोद महाजनांची आठवण

अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात राज कुंद्राला न्यायालयाकडून जामीन मंजूर

ठरलं तर! काँग्रेसकडून रजनी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी

चेन्नईच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची अपडेट! रायडू आयपीएल खेळणार की नाही?, आली मोठी माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More