बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्ही कोरोनाने मेलो तरी हरकत नाही, मुलांना लस मिळायला हवी होती”

जयपूर | आपल्याला माहीत आहे का, लस कुणाला दिली जाते. आपल्या देशात आजवर कोणतीही लस केवळ मुलांनाच देण्यात आली आहे. वृद्धांना लस कुठे लागते?कोरोनातही सर्व प्रथम मुलांनाच लस टोचली जायला हवी. कारण मुले सुरक्षित असणं आवश्यक आहे, असं राजस्थानचे जल आणि उर्जामंत्री बी डी कल्ला यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींचे लसीकरण धोरण चुकीचं आहे. लस आली तर ती सर्वप्रथम मुलांना टोचायला हवी. मात्र मोदी सरकारने असं केलं नाही. यामुळेच समस्या एवढी वाढली आहे, असं म्हणत बी डी कल्ला यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

मी स्वतः वृद्ध लोकांना बोलताना ऐकले आहे, की आम्ही तर असेही 80-85 वर्षांचे झालोच आहोत. आमचा कोरोनाने मृत्यूही झाला तरी काही हरकत नाही. मात्र, मुले सुरक्षित राहणे आवश्यक आहे. यामुळे सर्वप्रथम मुलांना लस देण्यात यावी, असं बी डी कल्ला म्हणाले.

दरम्यान, कोरोना महामारी आणि लसीकरणासंदर्भात बिनबुडाचे वक्तव्य करणाऱ्या नेत्यांच्या यादीत राजस्थानचे जल आणि उर्जामंत्री बीडी कल्ला यांच्याही नावाचा आता समावेश झाला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

थोडक्यात बातम्या- 

भाजपला मोठा धक्का!; एकाचवेळी 15 नेत्यांचा पक्षाला रामराम

“…हे सत्य स्वीकारण्याची मानसिकता विरोधकांनी ठेवायला हवी”

‘…म्हणून इतक्यात पेरणी करू नका’; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला

‘2024 नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…’; भाजप नेत्याची बोचरी टीका

‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण…’; संजय राऊतांचा खुलासा

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More