बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शासकीय वाहने मिळूनही अधिकाऱ्यांनी घेतला वेगळा वाहन भत्ता; पुणे पालिकेला लाखोंचा भुर्दंड

पुणे | शासकीय वाहने वापरण्यासाठी असताना देखील पुणे महानगरपालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत वेगळा वाहन भत्ता घेतल्याचं उघडकीस आलं आहे. हा सर्व प्रकार पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या लक्षात आल्याने त्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, पुणे महानगरपालिकेतील अनेक अधिकाऱ्यांना शासकीय वाहने वापरण्यासाठी दिलेली असताना देखील त्यांनी वेगळा वाहन भत्ता महानगरपालिकेकडून घेतला. यामुळे पुणे महापालिकेला लाखोंचा भुर्दंड बसल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने वेगळा वाहन भत्ता लाटल्याने आता हे प्रकरण त्यांच्या चांगलंच अंगलट येणार असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.

पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करून अतिरिक्त घेतलेला वाहन भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनामधून कपात करण्याचे आदेश देत संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई देखील करण्यास सांगितलं आहे.

हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर महापालिकेतील अधिकाऱ्यांना शासकीय वाहन किंवा वाहन भत्ता यापैकी कोणताही एकच लाभ मिळणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाहन भत्ता म्हणून घेतलेली रक्कम आता अधिकाऱ्यांच्या वेतना मधून कपात करण्यात येणार असल्याने यापुढे अशा प्रकारचे गैरप्रकार होण्यास वचक बसेल, असं सांगण्यात येत आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More