मुंबई | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्याचा आज दुसरा दिवस असून त्यांनी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची भेट घेतली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबई फिल्मसिटीबाबत वक्तव्य केलं आहे.
मुंबईतील फिल्मसिटी दुसरीकडे हलवणं सोप्प नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान योगींची सिनेसृष्टीतील दिग्गजांबरोबर देखील ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक होणार आहे.
दक्षिण भारतामधील फिल्म इंडस्ट्री देखील फार मोठी आहे. पश्चिम बंगाल आणि पंजाबामध्येही फिल्मसिटी आहेत. मात्र योगीजी त्या ठिकाणी दिग्दर्शक आणि कलाकारांशी चर्चा करतील का? का मुंबईतच ते असं करणार आहेत?, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, चित्रपट उद्योग उत्तर प्रदेशमध्ये नेण्याचा योगी आदित्यनाथ यांचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसने केला असतानाच कोणाला जोरजबरदस्तीने राज्यातून उद्योगांना जाऊ देणार नाही, असं इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
“माझ्याकडे 13 एकर आहे… तुला काम नसेल तर माझ्या शेतात मजुरीला ये”
“उद्धव ठाकरेंना आव्हान देणं हे योगी आदित्यनाथ यांना जमणार नाही”
“अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ‘ठग’”
भाजप खासदार आणि अभिनेते सनी देओल यांना कोरोनाची लागण
“बाबरीचे ढाचे कोसळताच बगला वर केलेल्यांची हिंदुत्वाची पोपटपंची हा विनोदच”