Top News देश

बिहारमधील अहंकारी सरकारला बदलण्याची वेळ आली आहे- सोनिया गांधी

नवी दिल्ली | बुधवारी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची प्रकिया पार पडणार आहे. बिहारमधील नितिश कुमार यांचे सरकार अंहकारात बुडालेलं असून या अंहकारी सरकारला आता बदलण्याची वेळ आलीये, असं म्हणत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मतदानापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या निशाणा साधला आहे.

“मी बिहारच्या ऐतिहासिक आणि पवित्र भूमीला नमन करते. बिहारमधील सरकार आणि अहंकारत बुडालेले सरकार आपल्या मार्गावरुन भरकटलेलं,” असल्याचेही सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.

बिहारमधील कामगार असहाय्य झाले आहेत. शेतकरी देखील चिंतेत आहेत. तर तरुण वर्गही निराश आहेत. आज बिहारमधील लोकांना अर्थव्यवस्थेच्या बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. आज बिहारमधील जनता आज काँग्रेसमहाआघाडीसमोर उभी असल्याचे सोनिया म्हणाल्या.

त्याचबरोबर आता नवे विचार आणि नवी शक्ती निर्माण झाली असून नव्या भारताचा अध्याय लिहिण्याची वेळ आली असल्याचेही सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –

नितीश कुमार शारीरिक आणि मानसिकरित्या थकलेत; तेजस्वी यादव यांचा टोला

पंकजा मुंडे यांच्यासह 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल!

पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे काम प्रभावी होईल; ‘या’ खासदाराने व्यक्त केली खदखद

‘…असं सरसंघचालक मोहन भागवत कधीच सांगणार नाहीत- शिवसेना

योग्य वेळ आली की शिवसैनिकच नारायण राणेंना उत्तर देतील- अशोक चव्हाण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या