बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बिग बाॅसच्या घरात गेले ही माझी चूक होती, मात्र…’- शिवलीला पाटील

बुलडाणा | मराठी बिग बाॅसमध्ये सर्वात जास्त चर्चेत असणारी व्यक्ती म्हणजे कीर्तनकार शिवलीला पाटील. शिवलीलाने काही दिवसांपूर्वी स्वतः बिग बाॅसचं घर सोडलं आहे. मात्र घरातून बाहेर आल्यानंतर तिला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागत आहे. अशातच शिवलीलाचं कीर्तन आयोजित करणाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बुलडाणा येथे शिवलीलाचं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी वारकरी सांप्रदायने याला विरोध केला. मात्र, तरी देखील आयोजकांनी कीर्तन रद्द केलं नाही. यामुळे तीन आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर आता शिवलीलाने त्यावर स्पष्टीकरण देखील दिलं आहे.

बिग बाॅसच्या घरात जाऊन मी चूक केली. मात्र मी तिथं राहून वारकरी संस्कृतीचं दर्शन घडवलं, मी अभंग गायले, ज्ञानेश्वरी वाचली, असं शिवलीलाने म्हटलं आहे. तसेच बिग बाॅसच्या घरात जाऊन देखील मी माझी वारकरी संस्कृती सोडली नाही. मात्र, केवळ एक महिला कीर्तनकार असल्याने वारकरी सांप्रदाय विरोध करत असल्याचं शिवलीला यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आयोजित करण्यात आलेल्या कीर्तनाला 200 हून अधिक लोक जमली होती. मात्र कोरोना काळात गर्दी जमवून न देण्याचा आदेश जिल्हाधिकऱ्यांनी दिले होते. त्यामुळे आता आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

भाजपला मोठा धक्का! ‘या’ विद्यमान मंत्र्याने केला काॅंग्रेसमध्ये प्रवेश

फक्त 6 रुपये घेऊन मुंबईत आला, मात्र त्यानंतर ‘मिस्टर बजाज’ने गाजवली बाॅलिवूड इंडस्ट्री

‘कुणी मला सांगेल का?, आज वसुली चालू आहे की बंद?’; अमृता फडणवीसांचा खोचक टोला

“आजचा ‘महाराष्ट्र बंद’ म्हणजे सरकारचा पुरस्कृत दहशतवाद”

“माझा मुलगा 11 वर्षांचा असताना अचानक गेला, त्यावेळी फक्त शाहरूख खान…”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More