Top News नंदुरबार महाराष्ट्र

‘मी भाजपमध्ये प्रवेश केला असता तर…’; मंत्रिमंडळातील ‘या’ मंत्र्याचं मोठं वक्तव्य

मुंबई | सिल्लोड तालुक्यात एकहाती वर्चस्व असलेले आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या शिवसेना प्रवेशाचे समर्थन केलं आहे. नंदुरबारमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

मी भाजपमध्ये प्रवेश केला असता तर ती माझी राजकीय आत्महत्या ठरली असती, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. सत्तारांच्या या वक्तव्यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राजकीय आयुष्यात अनेक राजकीय निर्णय चुकत असतात, तसाच माझा हा निर्णय चुकला असता तर ही माझी राजकीय आत्महत्या ठरली असल्याचं सत्तार म्हणाले. काही दिवसांमागे सत्तारांनी विधान परिषदेचा निकाल लागल्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर निशाण साधला होता.

चंद्रकांतदादा हिमालयात गेल्यास आम्ही तिकडे त्यांची व्यवस्था करू. इतकेच नव्हे तर मोदी साहेबांनाही हिमालयाची खूप माहिती आहे. त्यामुळे आता चंद्रकांतदादांनी खरंच हिमालयात जायला हवं, असं सत्तार म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या-

“कुणाचा तरी मुलगा आणि कुणाचा तरी पुतण्या म्हणून राजकारणात किंमत असलेल्यांपैकी मोदी नाही”

शेतकरी दिनी बळीराजाला आंदोलन करावं लागतंय हे दुर्दैव- शरद पवार

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मोठा झटका!

“ताडी गंगेच्या पाण्यापेक्षा शुद्ध, ताडी प्यायल्याने कोरोना होत नाही”

…अन्यथा तुर्कीसारखी परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही- रोहित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या