बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘प्रश्न विचारणं सोपं असतं, त्याला काही अकलेची गरज नसते’; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना खोचक टोला

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. त्याचबरोबर त्यांनी विरोधकांनाही चांगलंच सुनावलं.

सातत्यानं महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्यांवर आणि सरकारवर नेहमीच निशाणा साधणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलं आहे.

काम न करता बोलणारे अनेकजण आहेत. मात्र काहीजण असेही आहेत जे काम करतात पण बोलून दाखवत नाही, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला आहे.

दरम्यान, आम्ही काही लपवत नाही. आमचा कारभार उघड आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. महापालिका नेमकी काय आहे, काय कामं करते हे जनतेला समजलं पाहिजे. प्रश्न विचारणं सोपं असतं, त्याला काही अकलेची गरज लागत नाही, असंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

थोडक्यात बातम्या – 

राज्यात पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांना आर्थिक फटका

…म्हणून पार्टीवर 10 हजार रुपये खर्च करुन करतायेत कोरोना पॉझिटिव्ह लोकांसोबत डिनर

“कुणी पाठीशी उभं नाही राहिलं तरी मी एकटा लढेन”

पालकांनो सावधान! लहान मुलांना कोरोना होण्याची संख्या ‘इतक्या’ पटीने वाढली

“गोड बोलण्यासाठी तिळगूळाची गरज नाही, आमचा कारभार उघड आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More