बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर ठरलं! बारावीच्या निकालाचा ‘असा’ असणार फॉर्म्युला, शालेय शिक्षण विभागानं दिली माहिती

मुंबई | कोरोना महामारीच्या संकटामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून लांबणीवर पडलेल्या बारावीच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. मात्र, बारावीच्या विद्यार्थ्यांना गुण कसे दिले जाणार याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम होता. अशातच आता शालेय शिक्षण विभागाने बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला कसा असेल, याबद्दल माहिती दिली आहे.

बारावीच्या अंतिम निकालामध्ये दहावी, अकरावी आणि बारावीच्या मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरले जातील, असा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीसाठी 30 टक्के, अकरावीसाठी 30 टक्के आणि बारावीसाठी 40 टक्के अशी विभागणी करुन मुल्यमापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

दहावीच्या अंतिम परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण बारावीच्या अंतिम निकालामध्ये ग्राह्य धरले जातील. यानुसार बारावीच्या अंतिम निकालाचा 30 टक्के भारांश दहावीच्या गुणांवर  असेल.  अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुणांवरुन बारावीच्या अंतिम निकालामध्ये 30 टक्के भारांश असेल.

तर उर्वरित 40 टक्के भारांश हा बारावीतील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, चाचण्या यामधील गुणांवर आधारित असेल. अशाप्रकारे यंदाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकालाचा फॉर्म्युला असेल.

थोडक्यात बातम्या –

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस??; अमित शहांसोबतच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

‘लसीकरण झाल्यावर प्रत्येकाने 500 रूपयांची पंतप्रधान निधीत मदत करावी’; भाजपच्या या महिला मंत्र्यांचं आवाहन

“राष्ट्रवादीने दगड मारला कशावरून, कुणी जर स्वत:च गाडीवर दगड मारून घेत असेल तर काय बोलायचं?”

‘मी शिवसेनेत राहू नये असं अनेकांना वाटतं’; पक्षांतर्गत वाद पेटला!

सोन्याचा भाव आज पुन्हा वाढला, जाणून घ्या ताजे दर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More