बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मिकाचा राज कुंद्राला पाठिंबा; म्हणतो, “मी अॅप बघितलं, त्यात फार काही नव्हतं”

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे. अश्लील चित्रपट तयार केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्यांना अटक केली आहे. अशातच आता राज कुंद्रा यांच्या बाजूने प्रसिद्ध गायक अर्थात रॅपर मिका सिंग यांनी भाष्य केलं आहे.

राज कुंद्रा यांचे अनेक अॅप्स आपण पाहिले असून त्यांच्या अॅप्समध्ये फार काही नव्हतं, असं मिका सिंग यांनी म्हटलं आहे. तसेच मिका सिंग यांना संबंधित अॅपची अधिक माहिती नाही, मात्र राज कुंद्रा ही एक चांगली व्यक्ती असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे. मुंबईमध्ये पापाराजींसोबत बोलताना मिका यांनी हे सर्व म्हटलं आहे.

पापाराजींसोबत बोलताना मिका यांनी एवढंच भाष्य न करता जे होईल ते चांगलंच होईल आणि राज चांगला मुलगा असल्यामुळे चांगलंच होईल असं देखील म्हटलं आहे. तसंच काय होईल याची आपण देखील वाट बघत असून आता न्यायालयच सत्य आणि असत्य काय ते सांगू शकते, असंही मिकाने म्हटले आहेत.

दरम्यान, क्राईम ब्रँचनुसार राज कुंद्रा यांनी तब्बल 10 करोड या उद्योगात लावले होते. एवढंच नाही तर अश्लील अॅपच्या उद्योगात राज कुंद्रा सहभागी असल्याचं फेब्रुवारीमध्येच समोर आलं होतं, मात्र ठोस पुरावे नसल्यामुळे क्राईम ब्रँचचा तपास सुरु होता, असंही आता समोर आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाचं संकट जात नाही तेच दुसरं संकट, बर्ड फ्ल्यूमुळे देशात पहिला मृत्यू

Ind Vs Sri: चहरनं केला कहर, भारत हारता हारता वाचला!

“पेगॅससचे खरे बाप देशातच”; सामनातून शिवसेनेची ‘ही’ आक्रमक मागणी

“तेव्हा मनमोहन सिंगांनी कारवाई केली, तुम्ही कधी करणार?”

“म्हणून मी फिल्म इंडस्ट्रीला गटार बोलते, प्रत्येक चमकणारी वस्तू सोनं नसतं”

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More