हैद्राबाद | आंध्र प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी एका कॅन्सर पीडितासाठी विमानतळावरच 20 लाखांची मदत केली आहे. 15 वर्षांच्या नीरज नावाच्या मुलाला त्यांनी मदत केली आहे.
नीरजला कॅन्सर आहे. त्याच्या उपचारासाठी 20 लाखांचा खर्च येणार असल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं होतं. कुटुंबीयांकडे पैसे नसल्याने ते चिंतेत होते. शेवटी त्यांना वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रेड्डी यांच्याकडे मदत मागण्याचं आवाहन केलं.
नीरजचे आई-वडील पत्रकं घेऊन विमानतळावर थांबले होते. यावेळी जगनमोहन रेड्डी यांनी कुटुंबीयांची भेट घेत सरकारी खर्चातून नीरजच्या उपचारासाठी 20 लाखांची मदत केली आहे.
दरम्यान, नुकतंच 30 मे रोजी जगनमोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या पक्षाने विधानसभेत 175 पैकी 151 जागांवर विजय मिळवत आंध्रात एकहाती सत्ता मिळवली आहे.
महत्वाच्या बातम्या
-जातपंचायतीच्या सदस्यांनीच केला अतिप्रसंग; गर्भपाताला नकार दिल्याने कुटुंबाला टाकलं वाळीत!
-राष्ट्रवादीच्या महिलांनी दारुअड्डे केले उद्ध्वस्त
-जम्मू-काश्मीरमध्ये ‘हा’ इतिहास घडवण्यासाठी भाजपचं प्लॅनिंग सुरु?
-नेहा कक्करचा आज वाढदिवस; ‘या’ एका व्हीडिओने ठरली होती सुपरस्टार
-मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी, त्यामुळे गठबंधनचा प्रयोग करुन पाहिला- अखिलेश यादव
Comments are closed.