बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जालन्यात मारहाण झालेल्या प्रेमी युगुलाचं बुलडाण्यात शुभमंगल

बुलडाणा | जालन्यात टोळक्याने प्रेमी युगुलाला बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. याप्रेमी युगुलांनी बुलडाण्यात लग्न केलं आहे. बुलडाण्याच्या मेंढगावातील मंदिरात त्यांनी लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील एक प्रेमी युगल काही दिवसांपूर्वी जालन्यातील गोंदेगावात फिरायला गेले होते. यावेळी तळ्याच्या दिशेने जाणाऱ्या दोघांना टोळक्याने गाठलं आणि धमकावायला सुरूवात केली.

आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. तळ असल्यामुळे आम्ही फिरायला आलो, असं तरूण काकुळतील येऊन चौघांना सांगत होता. अगदी टोळक्याच्या हाता-पाया पडून त्याने माफी मागण्याचा केविलवाणा प्रयत्नही केला. मात्र मस्तवाल तरूणांनी तरूणीच्या वडिलांना सांगितलं आहे.

दरम्यान, प्रेमी युगुलाला मारहाण होतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

ट्रेंडिंग बातम्या- 

कामाला लागा…पवार साहेबांना पंतप्रधान बनवायचंय; रोहित पवारांची साद

“एक दिवस ओवैसी देखील हनुमान चालिसा म्हणताना दिसतील”

महत्वाच्या बातम्या- 

“एक शिवप्रेमी म्हणून मी तुमच्या बरोबर आहे. हीच ती वेळ, जय शिवराय,”

“अजित दादा आपल्या पाठिशी आहे, काळजी करू नका”

मी घुसखोर नाही, तर घुसखोरांचा बाप- असदुद्दीन ओवैसी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More