जालना | जालन्यात एकिकडे भाजप कार्यकारिणीची बैठक सुरु होती तर दुसरीकडे भाजप नेत्यानं शेतकरी कुटुंबाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. अत्यंत अमानुषपणे या कुटुंबाला मारहाण झालीय.
रावसाहेब भवर असं या नेत्याचं नाव आहे. तो भाजप किसान मोर्चाचा जिल्हाध्यक्ष असल्याचं कळतंय.
रावसाहेब भवर आणि शेतकरी विठ्ठल खांडेभराड यांच्यात 28 एकर शेतजमिनीवरुन वाद सुरु आहे. याच जमिनीत भवरला विहिर खोदायची होती.
खांडेभराड कुटुंबानं याला विरोध केल्यानं या कुटुंबाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार; अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न
–काँग्रेस नेते आणि कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्याचं महिलेसोबत असभ्य वर्तन
-भाजप-शिवसेना युतीसाठी मी पुढाकार घेईन- महादेव जानकर
–आता तुम्हालाही येऊ शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन…
–देश चोरांच्या हाती जाऊ नये म्हणून युती हवी; नाहीतर कुणासमोर लाचार नाही!