जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, 2 जवान शहीद, 2 दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमध्ये एकाच ठिकाणी 4 दहशतवादी हल्ले झालेत. पुलवामा, साम्बुरा गाव, अनंतनाग आणि कुपवाडमध्ये दहशतवादी घुसले असून त्यांनी काही ठिकाणी हल्लेही केलेत.

पुलवामामध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांची चकमक झाली. त्यामध्ये 2 भारतीय जवान शहीद झाले तर एका दहशतवाद्याचा खात्मा केला. साम्बुरा गावात दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाली असून जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केलंय.

CRPF जवानांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यामध्ये एक भारतीय जवान जखमी झाला तर एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलंय. त्याचबरोबर कुपवाड्यात सुरक्षारक्षकांनी ग्रेनेड जप्त केलंय.