बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जमशेदजी टाटा ठरले जगातील सर्वाधिक दानशूर व्यक्ती; गेल्या 100 वर्षांत केलं सर्वाधिक दान

मुंबई | हुरुन रिपोर्ट आणि एडेलगिव फाउंडेशनच्या वतीने दान करणाऱ्या ट़ॉप 50 लोकांची एक यादी तयार करण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार जमशेदजी टाटा यांनी गेल्या 100 वर्षांत तब्बल 102 बिलियन डॉलर्सचं दान दिलं आहे.

टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांनी 1892 पासून दिलेल्या मोठ्या देणग्यांचा या हुरुन रिपोर्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. दानशूर लोकांच्या यादीमध्ये टाटा यांनी बिल गेट्स, वॉरेन बफे यांनादेखील मागे टाकलं आहे.

भारतातील मोठ्या दानशूर व्यक्तींमध्ये विप्रोचे अजीम प्रेमजी यांचाही समावेश आहे. मात्र गेल्या 100 वर्षांच्या दानशूर लोकांच्या यादीत टाटा समुहाचे संस्थापक जमशेदजी टाटा हे प्रथम स्थानी आहेत. टाटांनी आरोग्य आणि शिक्षणासाठी मोठं दान दिलं आहे.

दरम्यान, कोरोनाकाळात टाटा समूहाने देशाची मोठी मदत केली आहे. टाटा समूहाच्या कंपन्या काही रक्कम गोळा करत आहेत, ज्यातून हॉस्पिटल बेड्स, ऑक्सिजन पुरवठा आणि आपल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण या गोष्टी सहजरित्या शक्य होतील. टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या पुढाकाराने ‘नो लिमिट’ मदतीची एक योजना आखली आहे. टाटा समूह या योजनेसाठी तब्बल 2000 कोटी रुपये खर्च करणार आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारने घेतले हे मोठे निर्णय; पाहा एका क्लिकवर

मी माझ्या मेलेल्या आईची शपथ घेऊन सांगतो, असे धंदे मी करत नाही- जितेंद्र आव्हाड

मंत्री बच्चू कडूंनी वेशांतर करुन टाकलेल्या धाडीमुळे धक्कादायक माहिती समोर!

भारताला पराभूत करत कसोटी क्रिकेटच्या पहिल्या विश्वचषकावर न्युझीलंडने कोरलं नाव

मोठी बातमी! डेल्टा प्लस कोरोनानं घेतला पहिला बळी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More