बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जयंत पाटील आले, मात्र एकाही शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाहीत”

बीड | राज्याच्या बहुतांश भागात मागील तीन दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे. तर मराठवाड्याच्या काही भागात ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील सर्वच धरणं तुडूंब भरले आहेत. अनेक नद्यांनी पात्र सोडल्यानं नद्यांचं पाणी शेतात शिरलं आहे. मराठवाड्यात कधी नव्हे ते इतका प्रमाणाबाहेर झालेल्या पाऊसाने शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे.

भाजप नेत्या आणि राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. परळी तालुक्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी पंकजा मुंडेंनी केली आहे. पिकाच्या नुकसान भरपाईसह जमीन खरवडून गेल्यानं तातडीने उपाययोजना करण्याची मागणी मुंडेंनी केली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील पक्षाच्या परिसंवाद यात्रेनिमीत्त जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आमच्या सरकारच्या काळात मोबाईल वाजला तरी शेतकऱ्यांना वाटायचं की मदत आली. आताच्या सरकारमध्ये कसलीही मदत नाही. पाटील यांनी बीडचा दौरा केला पण, त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही, अशी जोरदार टीका पंकजा मुंडेंनी पाटील यांच्यावर केली आहे.

दरम्यान, काल जयंत पाटील यांच्यासह धनंजय मुंडे हे गोपीनाथगडावर गोपीनाथ मुंडेंच्या समाधीस्थळी भेट दिली होती. त्यावर प्रतिक्रिया देत पंकजा मुंडे म्हणाल्या की, नतमस्तक होण्यासाठी सर्वांना गोपीनाथगडावर यावं लागतं, हीच मुंडेंची कन्या म्हणून माझी ताकद आहे. तसेच धनंजय मुंडेंच्या पाठीमागे कोण आहे, हे मला माहित नाही. आता सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर व्हायला पाहिजे, असं देखील पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“शेतात गुडघाभर पाणी आहे, नुकसान फक्त टक्केवारीत मोजू नका”

दिल्लीची दंगल अचानकपणे घडली नव्हती, तर…; दिल्ली न्यायालयाने दिला मोठा निर्णय!

पंजाब काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर?

“…तर शेतकरीसुद्धा तुमचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याशिवाय राहणार नाहीत”

“जेव्हा लोक सत्तेसाठी लोभी होतात, तेव्हा ते आपल्या मुली…”; भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More