बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जरा जास्तच मुदत दिल्याबद्दल नारायण राणेेेंचे आभार”, जयंत पाटलांचा पलटवार

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नारायण राणे यांनी केलेल्या भविष्यवाणीनंतर त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही, असे म्हणत मार्चमध्ये भाजप सरकार महाराष्ट्रात सत्तेत येईल, असं भाकित केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीकेची झोड उठली आहे.

जयंत पाटील यांनी बोलताना म्हटले आहे की, गेली दोन वर्षे भाजप महाविकास आघाडी सरकार जाण्याच्या तारखा देत आहे, पण नारायण राणे यांनी मार्च म्हणजे जरा जास्तच मुदत दिल्याबद्दल त्यांचे आभार, तसेच पक्ष टिकवण्यासाठी अशी आश्वासने आणि असं वातावरण कायम ठेवावं लागतं, असंही त्यांनी बोलताना म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यात अनागोंदी कारभार सुरू असून भाजप सत्तेत नसल्यामुळे असं होत आहे, असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं. त्यावर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्यातच नारायण राणे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच नवाब मलिक, अनिल परब आणि जयंत पाटलांसह नाना पटोले यांनी देखील नारायण राणे यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेत त्यांच्यावर टीका केली आहे.

थोडक्यात बातम्या

महाराष्ट्रातील कोरोना आला आटोक्यात, जाणून घ्या आकडेवारी एका क्लिकवर

मैदानात घातला पंचाशी वाद! ‘या’ भारतीय खेळाडूवर कारवाईची शक्यता

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; निकटवर्तीयावर गुन्हा दाखल

नवाब मलिकांच्या घराची रेकी करणारे नेमके कोण?, मलिकांनी फोटो ट्विट करत…

संप मिटण्याची शक्यता! कर्मचारी आणि सरकारमध्ये चर्चेस पुन्हा सुरूवात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More