बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

’25 वर्षाचा संसार मोडला’, असं म्हणणाऱ्या महाजनांना जयंत पाटलांनी दिलं हे सणसणीत उत्तर

जळगाव | भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) युतीवरून सतत दोन्ही पक्षांमध्ये वाद रंगलेले पाहायला मिळतात. सरकार स्थापन करताना शिवसेनेने भाजपसोबत जायला नकार दिला होता. तर आता भाजपनेही शिवसेनेसोबत युती करण्याची इच्छा नसल्याचं सांगितलं आहे. मात्र, आता पुन्हा एकदा शिवसेना -भाजप युतीचा मुद्दा चर्चेत आला आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या मुलाच्या लग्नातील एका किस्यामुळे पुन्हा एकदा या मुद्द्यावर लक्ष वेधलं गेलं आहे.

गुलाबराव पाटील यांचा मुलगा विक्रम याच लग्न नुकतच पार पडलं. यावेळी राजकीय क्षेत्रातील विविध नेतेमंडळी या लग्नाला उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना आमचा 25 वर्षापासून चांगला संसार सुरु होता. मात्र, जयंतराव आपण आमचा 25 वर्षाचा संसार मोडून टाकला, असा टोला लगावला होता. गिरीश महाजनांच्या या वक्तव्यानंतर लग्नमंडपात एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.

यानंतर महाजनांनी पुन्हा संसार मोडला असला तरी आमचे स्नेहसंबंध कायम आहेत, असं म्हणत सावरून देखील घेतलं. महाजनांच्या या टोल्यावर जयंत पाटलांनीही शांत न बसता भाजप मंत्र्याची खदखद अजून संपलेली दिसत नाही, त्यामुळे लग्न असो वा कार्यक्रम भाजप नेते ही खदखद बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात, असा प्रतिहल्ला त्यांनी केला होता.

दरम्यान, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुलाचं अगदी साध्या पद्धतीने पाळधी येथील मंदिरात लग्न पारं पडलं. याशिवाय गुलाबराव पाटील यांची सुन एक सर्वसामान्य कुटुंबातील आहे. मात्र, या लग्नाच्या प्रसंगीही महाजन आणि पाटील यांच्या कोपरखळ्यांमुळे दोन्ही पक्षातील कलह पुन्हा एकदा जनतेला पाहायला मिळाला आहे.

थोडक्यात बातम्या-

पहाटेच्या ‘त्या’ शपथविधीचा फडणवीसांना पश्चात्ताप, म्हणाले मी पुस्तक लिहून…

‘…आणि दुसरीकडे अजितदादांनी घेतलेल्या निर्णयाला वाटाण्याच्या अक्षदा’

पुणेकरांवर पुन्हा निर्बंध! नियम पुन्हा ‘जैसे थे’च

‘त्या’ व्हायरल डान्स व्हिडीओवर होणाऱ्या टीकेला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

1ली ते 4थी शाळा राहणार बंद?, ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More