बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्यांना जयंत पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमीबर सिंह यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या गंभीर आरोपांनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. तसेच भाजपने अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच विरोधीपक्षांकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जावी, अशी मागणी केली जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवीटीची मागणी करणाऱ्या विरोधकांना जयंत पाटील यांंनी जोरदार टोला लगावला आहे. महिन्यातून दोन तीन वेळा विरोधी पक्ष राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करत असतो. यात नवीन काही नाही, असं जयंत पाटील म्हणाले. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका बदलली, हा आरोप चुकीचा आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची शहानिशा केली, तपशीलात जाऊन तपासणी होत आहे, अशी माहिती जयंत पाटलांनी दिली आहे. तसेच मंत्रिमंडळात कोणत्याही बदलाची आवश्यकता नाही, हे आम्ही याआधीही स्पष्ट केलंय, असंही जयंत पाटलांनी सांगितलं आहे.

दरम्यान, भाजपसह खासदार नवनीत राणा, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर, रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

काँग्रेसला धक्का! ‘हा’ माजी आमदार लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार

अन् पती पत्नीनं रचला इतिहास; राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच जुळून आला ‘असा’ योग!

नवनीत राणांची बाजू घेत सरकारवर टीका करणाऱ्या चित्रा वाघ यांना चाकणकरांनी सुनावलं, म्हणाल्या…

मुलगी दिली नाही म्हणून त्याने मुलीच्या आईलाच फूस लावून पळवलं, अन्…

जास्त मद्यपान केल्यामुळे मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम मिळणार का?, सर्वोच्च न्यायालय म्हणालं…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More