बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सत्तेत आल्याशिवाय मी काहीच करणार नाही, महाराष्ट्रासाठी काहीच देणार नाही”

नांदेड | माझ्या हातामध्ये सूत्रं दिल्यास ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देईन, अशी गर्जना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नांदेडमध्ये माध्यमांशी बोलत होते.

भाजपला आणि फडणवीसांना ऐवढाच कळवळा असता तर भूजबळांना एवढे वर्ष तुरुंगात खितपत ठेवलं नसतं. त्यांचे त्या काळात अतोनात हाल केले. एकनाथ खडसे सारख्या नेत्याला त्रास देवून पक्ष सोडण्यास मजबूर केलं. त्यामुळे आता ओबीसीसाठी आंदोलन करणं हे हास्यापद असल्याची टीका जयंत पाटील यांनी केलीये.

फडणवीस म्हणतात सत्तेत आल्यावर मी आरक्षणाचा प्रश्न सोडवणार. म्हणजेच सत्तेत आल्याशिवाय मी काहीच करणार नाही. सत्ता नसेल तर महाराष्ट्रासाठी काहीच देणार नाही, हा तर फडणवीसांचा दुटप्पीपणा आहे. परंतु त्यांनी सत्तेत येण्याची गरज नाही. आम्ही सरकार चालवण्यास सक्षम आहोत. त्यांनी फक्त आम्हाला मार्ग सांगावा, असं प्रत्युत्तर जयंत पाटील यांनी फडणवीसांना दिलं आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात केंद्र सरकारने आतापर्यंत सीबीआय, ईडी आणि आरबीयआयचा वापर करणे सुरु केले आहे. आरबीआयने सहकारी बँकामध्ये आमदार, खासदार आणि नगरसेवक यांना संचालक होता येणार नसल्याची नियमावली केली आहे. त्यामुळे चांगल्या चालत असलेल्या संस्था बंद करण्याचा हा उद्योग आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

थोडक्यात बातम्या- 

नरेंद्र मोदींविरोधात बोलल्याने योगी सरकारने महसूल अधिकाऱ्याला केलं निलंबित!

“अर्णब गोस्वामीविरुद्ध हक्कभंग आणून खळबळ माजवणारे सरनाईक हतबल का झाले?”

मास्क न घालणं नवरेवाला पडलं महागात; पोलिसांनी दंड ठोठावत दिला कारवाईचा आहेर

रिझर्व्ह बँकेचा राजकारण्यांना झटका; घेतला हा मोठा निर्णय

संघर्ष नको मग संवादातून मार्ग का काढत नाही?- प्रविण दरेकर

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More