सांगली | सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप रेणू शर्माने केले होते. तेव्हा भाजपने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती त्यासोबतच राज्यभर आंदोलन करणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र तक्रारदार तरूणीने आपली तक्रार मागे घेतल्याने भाजप नेते पेचात पडले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला आहे.
झाडावरील पानही पडले तरी पान का पडले म्हणून भाजपा आंदोलन करु शकतेॉ पण आम्ही त्याकडे फारसे लक्ष देत नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. वाळवा तालुक्यातल्या कुरळ येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
महिलेने तक्रार मागे घेतली आहे. पण मुळात आपण आधीपासून सांगत होतो, थोडा वेळ जाऊ दिला पाहिजे, पोलिसांचा तपास पूर्ण व्हायला पाहिजे, पोलीस जो निष्कर्ष काढतील त्याप्रमाणे पुढील कारवाई होईल, असं पाटील म्हणाले.
दरम्यान, सरकारला बदनाम करण्यासाठी आणि सरकारविरोधी वातावरणात निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असल्याचंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“…तर पवार साहेब ‘सीरम’मध्ये वशिला लावतील”
आघाडीत बिघाडी करायची नाही त्यामुळे मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही- अशोक चव्हाण
धक्कादायक! गावकऱ्यांनी जळता टायर कानावर फेकत हत्तीला पेटवलं
नोटाबंदीनंतर चलनातील या महत्वाच्या नोटा होणार बंद??; RBI ची महत्वाची माहिती