Top News

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार- जयंत पाटील

मुंबई | गेले कित्येक दिवस भाजपचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती ती चर्चा आज संपुष्टात आली असून खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केलंय.

एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शुक्रवारी दुपारी 2 वाजता प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

आज एकनाथ खडसे यांनी फोन करून भाजप पक्षाचा राजीनामा दिल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादीत आम्ही स्वागत करत आहोत, असंही जयंत पाटील म्हणालेत.

आता फक्त त्यांनाच प्रवेश दिला जाणार असून त्यांचे समर्थक येण्यास इच्छूक आहेत त्यांनाही काही दिवसात प्रवेश दिला जाईल असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय.

महत्वाच्या बातम्या-

अतिवृष्टीग्रस्तांना गुरुवारी आर्थिक मदत जाहीर करणार- उद्धव ठाकरे

भारतीय पोलिसांच्या देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेचा आम्हाला अभिमान- अजित पवार

…तर आम्ही भाजप नेत्यांचं अभिनंदन करू- बाळासाहेब थोरात

खडसेंच्या पक्षांतराच्या चर्चांवर पंकजा मुंडेंनी मौन सोडलं, म्हणाल्या…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या