नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि बिहार, उत्तर प्रदेशसारख्या काही राज्यांमध्ये पक्षासमोर असलेल्या अडचणी पाहता, पक्षानं आता कठोरपणे पुनर्रचना करावी किंवा अडगळीत पडण्यास तयार राहावं, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.
पक्षाला पुर्नजीवीत करण्यासाठी सर्जिकल कारवाईची आवश्यकता असल्याचं जयराम यांनी म्हटलं आहे. आपला उद्दामपणा जायला हवा, सत्तेतून जाऊन सहा वर्षे झाली असली तरी अनेकजण आजही मंत्री असल्यासारखं वागतात. असा टोला जयराम यांनी काँग्रेसला लगावला आहे.
काँग्रेस नेत्यांना स्वतःला बदलावं लागेल. आवश्यकता भासल्यास पक्षाने स्वतःला देखील बदलावं. अन्यथा आम्ही असंबद्धतेकडे पाहत आहोत, असंही जयराम यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पक्षातील नेतृत्वाच्या मुद्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रमेश म्हणाले, स्थानिक पातळीवरील नेत्यांना प्रोत्साहन देणं व त्यांना वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यांना स्वातंत्र्य आणि स्वायतत्ता द्यावी लागेल, असं जयराम यांनी सांगितलं.
ट्रेंडिंग बातम्या-
पुण्यात थांबून राज ठाकरेंनी घेतला ‘या’ व्यक्तीचा सल्ला!
आमदार सुनील टिंगरेंच्या नावानं मागितली जातेय खंडणी; टिंगरे, म्हणे तो मी नव्हेच!
महत्वाच्या बातम्या-
शेतकऱ्यांकडून महावितरणाने केली 22 हजार कोटींची लूट!
“सरकारच्या निर्णयामुळे एक दिवसाचा शासनाचा खर्च वाचला, उगाच बोंबाबोंब करू नये”
शरद पवारांचं गृहमंत्र्यांना पत्र; पोलिसांसाठी केली ‘ही’ मागणी
Comments are closed.