Top News

“त्यांचे बाप नव्हते तेव्हापासून भाजपमध्ये काम केलं, आता आयत्या पिठावर रेघा मारत आहेत”

मुंबई | किती मेहनत केली. पोलिसांच्या लाठ्या खाल्या. भाजपमध्ये आता जे आहेत त्यापैकी कुणीच नव्हतं. तेच काय त्यांचे बापही नव्हते. बाप म्हणजे आदराने बोलतोय. आता जे आहेत त्यांना विचारा कुणीतरी की, तुम्ही मोर्चा काढला का, उपोषण केलं का? काही नाही फक्त आयत्या पिठावर हे रेघा मारायला आले आहेत, अशी टीका भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केलेले जयसिंगराव गायकवाड यांनी केली आहे.

जयसिंगराव गायकवाड यांनी आज अधिकृतपणे राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी जयसिंग गायकवाड यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

भाजपमध्ये अस्वस्थ व्हायचं. कोंडमारा झाल्यासारखं वाटायचं. या लोकांच्या पाठीमागे उभं राहणं शक्य नाही. त्यामुळे मी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एखाद्या गोडाऊनमधून बाहेर आल्यावर आपण जसा मोकळा श्वास घेतो, तसा मी आता मोकळा श्वास घेतोय, असं जयसिंगराव यांनी सांगितलं.

आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. मान-सन्मान नाही, कामाची कदर नाही, केलेल्या कामाचं कौतुक नाही, चांगल्या कार्यकर्त्यांकडे लक्ष देत नाहीत, अशा पक्षात कोण राहील?, असं जयसिंगराव गायकवाड म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

शरद पवारांच्या उपस्थितीत जयसिंगराव गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती- संजय राऊत

“लक्षात ठेवा, पुढच्या दोन-तीन महिन्यात राज्यात भाजपचं सरकार असेल”

टीम इंडियाला मोठा धक्का; रोहित-इशांत शर्मा पहिल्या 2 कसोटी सामन्यांमधून बाहेर

…तर ती कोणती मर्दानगी होती?- प्रवीण दरेकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या