बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जेसीबीचा दात मानेत घुसला आणि… काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार

कोल्हापूर | कोल्हापूर मधील कसबा बावडा येथील झुम प्रकल्पावर काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. संबंधित ठिकाणी 60 वर्षाची महिला कचऱ्यातील स्क्रॅप गोळा करण्यासाठी गेली होती. यादरम्यान कचरा उचलण्यासाठी आलेल्या जेसीबीचा दात महिलेच्या मानेत घुसला. त्यानंतर अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे.

कसबा बावडा येथील झुम कचरा प्रकल्पावर संपूर्ण शहराचा कचरा टाकला जातो. रविवारी अनेक महिला या ठिकाणी स्क्रॅप शोधण्यासाठी आल्या होत्या. यादरम्यान पोकलॅन बकेटद्वारे जेसीबी चालक कचरा उचलत होता. कचऱ्याचा ढिग मागे असल्यामुळे चालकाला महिला नजरेस आली नाही आणि त्याने पोकलॅन बकेटने कचरा उचला. यावेळेस बकेटचा दात 60 वर्षाच्या एका महिलेच्या मानेत घुसला. बकेटचा दात महिलेच्या मानेत घुसताच तिचं शिर धडा वेगळं झालं.

मृत झालेल्या महिलेचं नाव मंगल राजेंद्र दावणे असं आहे. बकेटचा दात महिलेच्या मानेत घुसताच तिचं शिर धडावेगळं झाल्या कारणामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. एवढंच नाही तर महिलेचं धड घटनास्थळी कचऱ्याच्या खड्ड्यात राहीलं आणि शिर बकेटमधून कचऱ्यात गेलं. काही वेळानंतर चालकाला हा प्रकार लक्षात आला. यावेळी त्याला कचऱ्याच्या खड्ड्यात धड सापलं असून शिर न सापडल्या कारणाने त्यानं कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोध चालू केला. तीन तासच्या शोधानंतर शिर सापडलं.

दरम्यान, जेसीबी चालवायला दोन चालक होते. या दोन्ही चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच संबंधित महिला ही कोल्हापूरमधील तिरंगा चौकातील आठ नंबर शाळेजवळील शिवाजी पेठ येथे रहिवासी होती.

थोडक्यात बातम्या-

‘देशात अभूतपूर्व आणि युद्धसदृश परिस्थिती’; संजय राऊत यांनी केंद्र सरकारकडे केली ‘ही’ मागणी

येत्या दोन दिवसात बीडमध्ये रेमडेसिवीर उपलब्ध होईल- धनंजय मुंडे

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं निधन

होम क्वॉरंटाईन होऊन घरून उपचार घेत असाल तर सावधान;’या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करणं ठरू शकतं धोकादायक

“…तर दिल्लीच्या नाका-तोंडाला प्राणवायूच्या नळकांड्या लावाव्या लागतील”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More