देश

जेईई मेन आणि नीट परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार!

नवी दिल्ली | मेडिकल आणि इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्य़ांसाठी केंद्र सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. नीट आणि जेईई मेन या परीक्षा वर्षातून दोनदा होणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

जेईई मेन परीक्षा वर्षात जानेवारी आणि एप्रिल मध्ये होतील. तर नीट परिक्षा फेब्रुवारी आणि मे या महिन्यात होतील. या परीक्षा वर्षातून एकदाच व्हायच्या त्यामुळे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वर्षभर वाट पहावी लागायची.

दरम्यान, आतापर्यंत ही परीक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ घेत होते. मात्र आता राष्ट्रीय परीक्षा एजन्सी या परीक्षा घेणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळेच महिलांवर अत्याचार- भाजप खासदार

-कमांडो न घेता फडणवीस-गडकरींनी नागपुरात फिरून दाखवावं!

-प्रकाश आंबेडकर सोलापूर मतदारसंघातून लोकसभा लढणार?

-मुंबईचं दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

-आमदार संग्राम जगताप यांना जामीन; बाळासाहेब कोतकरही सुटले!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या