मुंबई | मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या देशातील 59 व्यक्तींना आज ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर झालेत. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारे ‘जीवन रक्षा पदक 2020’ पुरस्कार आज जाहीर करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील परमेश्वर बालाजी नागरगोजे यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ जाहीर झालं आहे. तर ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार अनिल दशरथ खुले आणि बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे यांना जाहीर झाला आहे.
पुरस्काराचं स्वरूप पदक केंद्रीय गृहमंत्री यांच्या सहीचे प्रमाणपत्र आणि डिमांड ड्राफ्ट स्वरूपात पुरस्कार रक्कम असं आहे.
थोडक्यात बातम्या-
अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार घोषित
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलीस अॅक्शनमध्ये; ‘या’ चॅनेलवर केली मोठी कारवाई
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून महाराष्ट्राच्या 57 शूर पोलिसांना पदक जाहीर
टाटांची बहुचर्चित सफारी 26 जानेवारीला लाँच होणार; जाणून घ्या वैशिष्ट्यं
पोटच्या मुलींची हत्या केली; म्हणाले, सकाळी पुन्हा जिवंत होणार!