नंबरप्लेट काढली म्हणून भाजप नेत्याची आरटीओला मारहाण

रांची | अवैध नंबरप्लेट काढली म्हणून भाजप नेत्याने जिल्हा परिवहन अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या प्रकाराचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झालाय. 

सरकारी आदेशानूसार जिल्हा परिवहन अधिकारी एफ. बारला वाहनांच्या अवैध नंबरप्लेट हटवण्याचं काम करत होते. यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ उभ्या भाजप नेते राजधानी यादव यांच्या गाडीची नंबरप्लेटही त्यांनी हटवली.

दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच राजधानी यादव यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बारला यांना मारहाण करण्यास सुरुवात केली तसेच त्यांना शिवीगाळही केली. सध्या राजधानी यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतंय.