देश

पोटनिवडणूक : जिंदमध्ये भाजप मोठ्या विजयाच्या दिशेने; काँग्रेस तिसऱ्या स्थानावर

चंदीगड | हरयाणातील जिंद विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजप मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत असून, काँग्रेस मात्र तिसऱ्या स्थानावर आहे. हरिचंद मिड्ढा यांचं निधन झाल्यानं ही जागा रिक्त झाली होती.

भाजप उमेदवार कृष्णा मिड्ढा यांनी 7 व्या फेरीअखेर 28811 मतं तर जननायक जनता पार्टीचे उमेदवार दिग्विजय चौटाला यांनी 19403 मतं मिळवली होती. काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांना 11647 मतं मिळाली आहेत.

काँग्रेसचे उमेदवार रणदीप सुरजेवाला यांचे पोलिंग एजंट विरेंद्र जगलान यांनी ईव्हीएममध्ये गडबड झाल्याचा आरोप केला आहे. 2 ईव्हीएम मशीनचे आकडे जुळत नसल्याचा आरोप त्यांनी केला असून या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान, जिंद विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला एकदाही विजय मिळवता आला नव्हता.

महत्वाच्या बातम्या-

राजस्थानच्या रामगडमध्ये काँग्रेसचा विजय; भाजपला चारली पराभवाची धूळ

मुख्यमंत्रिपदावर असेपर्यंत भ्रष्टाचार करत रहायचा का?,अण्णांचा सरकारला सवाल

-रोहित शेट्टीचा दिलदारपणा, ‘सिम्बा’च्या कमाईतील मोठा वाटा मुंबई पोलिसांना

-“राहुलजी, आजाराशी संघर्ष करणाऱ्याविषयी खोटं बोलण्याइतके तुम्ही असंवेदनशील”

-भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांचे प्रकाश आंबेडकरांना आवाहन

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या