प्रजासत्ताक दिनानिमित्त जिओचा धमाका, वाढीव डेटा मिळणार!

मुंबई | प्रजासत्ताक दिनी जिओनं आपल्या ग्राहकांना अनोखी भेट दिलीय. आपल्या जुन्या प्लॅन्सच्या डेटामध्ये वाढ करण्याचा निर्णय जिओनं घेतलाय. याचा फायदा जिओच्या ग्राहकांना होणार आहे. 

147 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगसह 1 जीबी डेटा मिळत होता, आता हा डेटा वाढवण्यात आला असून यापुढे ग्राहकांना 1.5 जीबी डेटा मिळणार आहे. 

जिओनं आपल्या 198, 398, 448 आणि 498 349, 399 आणि 499 रुपयांच्या प्लॅनमध्येही बदल केलेत. या प्लॅनचाही डेटा लिमिट जिओकडून वाढवण्यात आला आहे. जिओ अॅपवर यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आलीय.