Top News तंत्रज्ञान महाराष्ट्र मुंबई

जिओकडून सर्वात स्वस्त प्लॅनची घोषणा, अनलिमिटेड कॉलिंगसह नेटही मिळणार!

Photo Courtesy- Facebook/Jio

मुंबई | रिलायन्स जिओने मार्केटमध्ये उतरताच आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना आपल्या इंटरनेट तसेच व्हाईस पॅकचे दर कमी करण्यास भाग पाडलं होतं, अनेक कंपन्यांनी तर यामुळे तोटा सहन करावा लागत असल्याचा आरडाओरडा सुरु केला होता, सुरुवातीला फ्री प्लॅन दिल्यानंतर मध्यंतरी जिओने सुद्धा आपल्या सर्वच प्लॅन्सची किंमत वाढवली होती. आता मात्र जिओनं आपल्या सर्वात स्वस्त प्लॅनची घोषणा केली आहे.

75 रुपयांच्या या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. यात अनलिमिटेड कॉलिंगची ऑफर दिली जात आहे, मात्र ही ऑफर फक्त ज्यांच्याकडे जिओफोन आहे, अशाच लोकांसाठी ऑफर करण्यात आली आहे, त्यामुळे दुसरा फोन असणाऱ्या ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येणार नाही, मात्र अशा ग्राहकांनाही जिओनं निराश केलेलं नाही. त्यांच्यासाठी दुसऱ्या स्वस्त प्लॅनची घोषणा जिओकडून करण्यात आली आहे.

नॉन जिओ फोन ग्राहकांसाठी कंपनीनं सर्वात स्वस्त म्हणजेच 125 रुपयांची ऑफर दिली आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये 0.5 जीबी डेटा रोज दिला जातो, म्हणजेच ग्राहकांना या पॅकमध्ये एकूण 14 जीबी डेटा मिळतो. रोज मिळणारा डेटा संपल्यानंतर याची स्पीड कमी होऊन ती 64Kbps होते.

जिओची लोकप्रियता चांगलीच आहे, अनेकांनी आपले दुसऱ्या कंपन्यांचे सीम जिओमध्ये पोर्ट केले आहेत, मात्र गेल्या काही दिवसांपासून जिओच्या नेटवर्कमध्ये अडचणी येत असल्याच्या तक्रारी देखील आहेत. त्यामुळे कंपनीने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी देखील ग्राहकांकडून होत आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाच्या रुग्णसंख्येत आज धक्कादायक वाढ, लोकहो काळजी घ्या!

अर्जुन तेंडुलकर मेहनती मुलगा; अंबानींकडून सचिनच्या मुलाचं तोंडभरुन कौतुक!

“ठाकरे सरकारचे शिवजयंतीवर निर्बंध मात्र शरद पवारांच्या उपस्थितीत मटणपार्टीला परवानगी”

गुंड गजा मारणेच्या मिरवणुकीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्याची गाडी!

एकत्र शिकणाऱ्या दोन मैत्रिणी पळाल्या, पोलिसांनी पकडल्यावर समोर आलं धक्कादायक कारण!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या