तंत्रज्ञान

जिओकडून ग्राहकांना दिवाळी गिफ्ट; जाणून घ्या ‘या’ नव्या ऑफर्स

मुंबई | दिवाळी आणि दसरा सण येण्याआधीच जिओनं ग्राहकांना गिफ्ट देण्यास सुरूवात केली आहे. जिओनं नवीन ग्राहक जोडण्यासाठी आकर्षक ऑफर लॉन्च केली आहे. ज्यात जिओ फोन केवळ 699 रूपयांना मिळत आहे. या फोनची बाजारात वास्तविक किंमत 1500 रूपये आहे. जिओ या फोनवर 800 रूपयांची सवलत देत आहे.

जिओकडून ही सवलत कोणत्याही अटींशिवाय देण्यात आली आहे.  ही किंमत विना कोणत्याही एक्सचेंज प्राइजची आहे. जो ग्राहक त्यांची दिवाळी 2019 ऑफरच्या माध्यमातून कंपनीशी जोडले जातील, त्यांना जिओ अतिरिक्त लाभ देखील देईल, असं जिओने म्हटलं आहे.

जिओनं दिवाळी ऑफरच्या अंतर्गत कंपनी ग्राहकांना पहिल्यांदा 7 रिचार्जवर जिओ 99 रूपयांचा अतिरिक्त डेटा देत आहे. यामुळे जिओ फोनच्या खरेदीवर ग्राहकांना 1500 रूपयांची सवलत मिळेल. ज्यात जिओ फोनवर 800 रूपयांची बचत आणि 700 रूपयांचा अतिरिक्त डेटाचा समावेश आहे.

जिओ फोन एक 4G फिचर फोन आहे. जो 4G नेटवर्कवर काम करतं. या फोनमध्ये एचडी व्हॉईस कॉलिंग, यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्स अ‌ॅपसारखे अ‌ॅप वापर करता येतो. यासोबतच जिओच्या रिचार्जवर या फोनमध्ये फ्री अनलिमिटेड कॉलिंग, 4G डेटाचा लाभ देखील मिळेल.

जिओच्या फोनमध्ये कंपनीनं 2.4 इंचाचा क्यूवीजीए डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये टॉर्च, एफएम रेडिओ, रिंगटोन, कॅमेरा अशा सुविधा ग्राहकांना  मिळतील.

महत्वाच्या बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या