बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“करेक्ट कार्यक्रम हा शब्दही चोरल्यासारखा वाटतो, हा शब्द नेमका कुणाचा हे सर्वांना माहितीये”

मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरातील सभेतून राज्यातील सत्ताबदलाबाबत भाष्य केलं होतं. सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, लवकरच बदलू, मी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करतो, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला सूचक इशारा दिला होता. यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांना जोरदार टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीसांनी करेक्ट कार्यक्रम हा शब्द वापरला. हा शब्दही चोरल्यासारखा वाटतो. हा शब्द नेमका कुणाचा आहे हे सर्वांना माहीत आहे, असा टोला जितेंद्र आव्हाडांनी फडणवीसांना लगावला आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

ताडदेव येथे 1000 नोकरदार महिलांची राहण्याची व्यवस्था होईल असं सुसज्ज वसतिगृह उभारण्यात येत आहे. नोकरदार महिलांसाठीचंच हे वसतिगृह असणार असून येत्या दीड ते दोन वर्षात हे वसतिगृह उभारण्यात येणार आहे. या वसतिगृहासाठी 35 कोटी खर्च येणार असून सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असं हे हॉस्टेल असणार आहे, असं आव्हाड म्हणाले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार हे वसितगृह उभारण्यात येत असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

मुंबईसह राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. म्हाडा कोरोना काळात कुठलीही जबाबदारी घेण्यास तयार आहे. लोकांना वाचवण्यासाठी त्यांना संरक्षण देण्यासाठी जेजे हवे ते करू, असंही ते म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

‘ब्रेक द चेन नव्हे तर चेक द ब्रेन’; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्याना टोला

हारी बाजी को जितना हमें आता है!; शेवटच्या 5 षटकांमध्ये चमत्कार झाला!

संचारबंदीकाळात सरकारकडून कोणाला किती पैसे मिळणार? वाचा सविस्तर

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात आढळले इतके रूग्ण!

लॉकडाऊनचे नियम- एकाच ठिकाणी संपूर्ण यादी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More