बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हिंमत असेल तर मोदींना ‘नरुद्दिन’ म्हणून दाखवा; जितेंद्र आव्हाडांचं आव्हान

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांना ‘जितुद्दिन’ म्हणून हिनवणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना आव्हाडांनी फेसबुक पोस्टद्वारे चांगलचं सुनावलं आहे. 

हिंमत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘नरूद्दिन’ म्हणून दाखवा, असं आव्हान जितेंद्र आव्हाडांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केलं आहे. 

नरेंद्र मोदींनी राजस्थान मधील अजमेर दर्ग्यात जाऊन चादर चढवली, आता तु्म्ही त्यांना नरूद्दिन मोदी म्हणणार का? असा प्रश्न जितेंद्र आव्हाडांनी फेसबुक पोस्टद्वारे विचारला आहे. 

दरम्यान, मोदींनी आता धर्मनिरपेक्ष उधार घेतला असून त्यांना आता तो दाखवावा लागतोय, असंही आव्हाड म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या-

-बारणे-जगतापांचं अखेर मनोमिलन; पार्थ पवारांच्या अडचणी वाढल्या

-कदाचित निकालानंतर राष्ट्रवादी पुन्हा भाजपला पाठिंबा देईल- प्रकाश आंबेडकर

-भाजपच्या सभेत तरूणाने विकासाबद्दल विचारला प्रश्न; खावी लागली जेलची हवा

-भाजप सरकार शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करणार; जाहीरनाम्यात दिलं आश्वासन

-होय… माझी दहशत आहे पण ती लोकांच्या हितासाठी- उदयनराजे भोसले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More