महाराष्ट्र मुंबई

“पवारसाहेब… तरी मी म्हणत होतो, या नेत्याची पक्षातून हकालपट्टी करा!”

मुंबई | नाईकांना 2014 साली पक्ष सोडायचा होता. हे मी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना कळवलं होतं. त्यांची त्याच वेळी पक्षाने हकालपट्टी करायला पाहिजे होती. पण पक्षाने माझं ऐकलं नाही. अखेर त्यांचा लबाड चेहरा समोर आला आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाईकांना लक्ष्य केलं आहे.

राष्ट्रवादीचे नवी मुंबईतले तगडे नेते गणेश नाईक आणि त्यांचे पुत्र आमदार संदीप नाईक 57 नगरसेवकांना घेऊन भाजपात जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्यावर आव्हाडांनी जोरदार हल्ला चढवला आहे.

पवार साहेबांनी आणि राष्ट्रवादीने नाईकांना अनेक संधी दिल्या. फक्त त्यांनाच संधी न देता त्यांच्या कुटुंबियांना देखील संधी दिल्या. मात्र त्यांनी पक्षाक्षी गद्दारी केली, असं आव्हाड म्हणाले.

दरम्यान, गणेश नाईकांनी पद्धतशीरपणे राष्ट्रवादीचं वाटोळं केलंय. कल्याण, मीरा-भाईंदर आणि भिवंडीत त्यांनी पक्ष संपवलाय, अशी जोरदार टीका आव्हाडांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

साताऱ्यानंतर सोलापूरातही काँग्रेस-राष्ट्रवादी धक्का बसणार???

सरपंचांसह उपसरपंचांना ‘अच्छे दिन’; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

आरक्षण नाही मात्र धनगर समाजासाठी सरकारची मोठी घोषणा!

वेल्हाचं नाव ‘राजगड’ करा; सुप्रिया सुळेंची आग्रही मागणी

छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशावर उद्धव ठाकरे म्हणतात…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या