अरे क्षुद्रा जागा हो, परिवर्तनाचा धागा हो- जितेंद्र आव्हाड

मुंबई |  आपल्या घणाघाती भाषणांनी आणि आक्रमक ट्वीटने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड पंतप्रधान मोदींवर शरसंधान साधत असतात. असंच एक बोचरं ट्वीट करत आव्हाडांनी पंतप्रधान मोदींवर निशाना साधला आहे.

चौकीदार नवीन आयोग नेमून मंडल आयोगाने दिलेले अधिकार रद्द करतोय.  अरे क्षुद्रा जागा हो, परिवर्तनाचा धागा हो.. असं आवाहन त्यांनी बहुजनांना केलं आहे.

साळी, कोळी, तेली, तांबोळी, आगरी, धनग,र माळी, वंजारी, कुंभार, गोसावी ह्या शिवरायांना साथ देणाऱ्या अठरा पगड जातींची मनुवादी माती करणार आहेत, असा घणाघात आव्हाडांनी भाजपवर केला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या काळात सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“आमच्या सुनेत्रा वहिनींशी कुणी पंगा घ्यायचा नाही, त्यांच्याकडे 4 खासदार आहेत”

-लालकृष्ण अडवाणी, मनेका गांधी, मनोहर जोशींना भाजपकडून मोठा झटका

-प्रणिती शिंदेंना भाजपकडून अनेकवेळा ऑफर, सुशीलकुमारांचा गौप्यस्फोट

-अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल

-नितीन गडकरींच्या पाठीवर सुषमा स्वराजांचा हात!