महाराष्ट्र मुंबई

‘ज्यांची नजर वाकडी त्यांना सगळंच वाकडं दिसतं’; आव्हाडांचा अमित शहांना टोला

मुंबई | ठाकरे सरकारला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीन चाकी सरकारची उपमा दिली होती. याला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

ज्यांची नजर वाकडी त्यांना सगळंच वाकडं दिसतं. आम्हाला तीन चाकी सरकार म्हणाले, म्हणू द्या. तीन चाकी तर हेलिकॉप्टरही असतं, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी अमित शहांना लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकरी आंदोलन हाताळण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळेच स्वत:ला वाचवण्यासाठी त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका आव्हाडांनी केली आहे.

हा देश दांडुक्यांना, लाठ्याकाठ्यांना घाबरत नाही. देशात क्रांती घडेल. तेव्हाच देश शांत बसेल. सरकारने लोकशाहीचं तंत्रं वापरावं, चर्चा करावी, असा सल्ला आव्हाडांनी केंद्र सरकारला दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

“भारतरत्नांची चौकशी करणारे असे रत्न देशात कुठेही सापडणार नाहीत”

…तर माझ्या बापाची औलाद सांगणार नाही; हर्षवर्धन जाधवांचा दानवेंना इशारा

शेतात पत्नीसोबत शरीरसुखाचा आनंद घेतला, त्यानंतर उचललं काळजाचा थरकाप उडवणारं पाऊल

‘या’ SUV ने विक्रीबाबतचे मोडले सर्व रेकॉर्ड, 4 महिन्यात इतक्या हजार गाड्या बुक

“स्वार्थासाठी कोण काम करतय, हे संपूर्ण सातारा जिल्ह्याला माहिती”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या