बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जितेंद्र आव्हाड तुम्हीही आता बॅग भरा”; किरीट सोमय्यांच्या हाताला नेमकं लागलंय काय???

सांगली | राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचारांचे आरोप होत असून अनेक नेत्यांना ईडीचं नोटीस देखील आलं आहे. अशातच आता भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांबाबत धक्कादायक वक्तव्य केलं आहे. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इलेव्हन सेना दिवाळीपर्यंत तरूंगात जाईल, तसेच जितेंद्र आव्हाड तुम्ही आता बॅग भरा, असा इशारा सोमय्या यांनी आव्हाड यांना दिला आहे. ठाकरे यांच्या इलेव्हन सेनेच्या भ्रष्टाचाराचे घोटोळे पुराव्यासह उघडकीस आणणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

सांगलीतील परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांना ईडीकडून नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे सोमय्या यांनी सांगली जिल्ह्यातील तासगाव वंजारवाडी गावासह खरमाटे यांची मालमत्ता असणाऱ्या ठिकाणांना भेटी दिल्या. बजरंग खरमाटे हे परिवहन मंत्री अनिल परब यांचे सचिव होते. बजरंग खरमाटे यांच्याकडे साडेसातशे कोटींची बेहिशोबी मालमत्ता आहे, असा आरोप सोमय्यांनी केला आहे.

दरम्यान, अलिकडेच महाविकास आघाडीतील 11 नेत्यांची यादी किरीट सोमय्या यांनी ट्विट केली होती. त्यामध्ये शिवसेना खासदार भावना गवळीसह जितेंद्र आव्हाड, अनिल परब आणि अनिल देशमुख यांच्याबरोबर अजून काही नेत्यांची नाव यादीत होती. त्यामुळे किरीट सोमय्या आता महाविकास आघाडीतील एकेक नेत्यांवर निशाणा साधत आहे.

थोडक्यात बातम्या- 

अक्षय बोराडे पुन्हा अडचणीत, पत्नीनंतर तरूणीने केला मोठा गुन्हा दाखल

शेअर मार्केटमधील सर्वात मोठी घडामोड, देशातील ‘या’ सर्वात जुन्या बॅंकेचा येतोय आयपीओ!

सत्ता स्थापनेच्या कार्यक्रमात तालिबाननं दिलं ‘या’ सहा देशांना निमंत्रण, भारताच्या कट्टर शत्रूराष्ट्रांचा समावेश!

“मुंडेने कितीही स्वतःला वाचवायचा प्रयत्न केला तरी नियती त्याला सोडणार नाही”

‘… त्यांना लाज कशी वाटत नाही’; बेळगाव महापालिकेच्या निकालानंतर राऊत भडकले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More