बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांंना जितेंद्र आव्हाडांचा टोला, म्हणाले…

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी फेसबुक लाईव्ह करत राज्यातील कोरोना वस्तुस्थिती जनतेसमोर मांडली. त्याचबरोबर पुढील 15 दिवस राज्यात संचारबंदी देखील लागू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. यावरून विरोधक महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना दिसत आहे. याला जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर आता होणारी टीका म्हणजे ….. नाआवडतीचे मीठ अळणी, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला टोले लगावले आहेत. जगेल तो जेवेल… मुख्यमंत्री महोदयांनी जे काही केल ते योग्यच केलं आहे. ती काळाची गरज होती. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक वर्गाचा, गोर-गरीबांचा, शोषितांचा विचार करून यावेळेसचे निर्बंध लावण्यात आलेले आहेत. सर सलामत तो पगडी पचास, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 15 दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू केला. हे करताना त्यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला. मात्र, प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंजी तरतूद करून त्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. तर अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी 7 कोटी कसे आहेत ? एवढा दरिद्री आहे का महाराष्ट्र माझा?, असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला होता.

दरम्यान, आधी कोरोना लसीवरून नंतर रेडमेसिवीर औषधावरून तर आता लाॅकडाऊनवरून भाजप महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. तर महाविकास आघाडीचे मंत्री देखील भाजपला जशास तसं उत्तर देताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

“एवढा दरिद्री आहे का महाराष्ट्र माझा?, मुख्यमंत्र्यांंनी जरा विचार करून बोलावं”

इथे मृत्यूही ओशाळला… एका पाठोपाठ एक मृतदेह, विद्युतदाहिन्याची धुरांडी वितळली!

‘मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या तोंडाला पानं पुसली’; चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका

“पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय”

रमजानसाठी सरकारकडून मार्गदर्शक सुचना जारी; वाचा काय आहेत निर्बंध

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More