महाराष्ट्र मुंबई विधानसभा निवडणूक 2019

मी फोनची वाट बघतोय पण मला कुणी फोनच करत नाही- जितेंद्र आव्हाड

मुंबई | सत्तास्थापनेवरून सध्या गदारोळ सुरू आहे. भाजपकडून आमदारांना फोडण्यासाठी फोन येत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलं आहे.

मी पण 50 कोटींच्या ऑफरच्या फोनची वाट बघतोय पण मला फोनच येत नाही,  असं मिश्कील ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. त्यांचबरोबर पाऊससुद्धा म्हणतोय की 12 महिन्यातले 6 महिने पाहिजेत, असं म्हणत 50-50 चा फॉर्म्युल्यावर त्यांनी भाष्य केलं आहे.

निवडणुकीचा निकाल लागून आता  2 होत आले तरी अजून सत्ता वाटपाचा तिढा कायम आहे. शिवसेना मुख्यमंत्रिपदावर ठाम आहे. त्यामुळे आता भाजप काय निर्णय घेणार याकडेच सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

अशा परिस्थितीत घोडेबाजार होण्याची शक्यता असते. तशी भिती शिवसेना आणि काँग्रेसकडून व्यक्त केली जात आहे. काँग्रेस आमदारांना 50 कोटींची ऑफर दिल्याचा गोप्यस्फोट विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तर भाजप कोणत्याही आमदारांना संपर्क करत नाही, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे.

 

जितेंद्र आव्हाड यांचं ट्वीट-

 

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या