Top News

PMO च्या ‘त्या’ ट्विटमुळं जितेंद्र आव्हाडांचा पहिल्यांदा बसला PMOच्या म्हणण्यावर विश्वास

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेच्या भाषणांचे मुद्दे ट्विट करत असताना PMOनं केलेल्या ट्विटमुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी PMOचे उपरोधिकपणे आभार मानले आहेत. त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

काँग्रेसनं राज्यघटनेतील कलम 356 चा गैरवापर बऱ्याचवेळा केला मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनात्मक संस्था उध्वस्त केल्या, असं ट्विट PMOनं केलं होतं.

तुमच्या मताशी आम्ही असहमत कसं होऊ शकतो, पहिल्यांदा PMOच्या म्हणण्यावर माझा विश्वास बसला, असं PMOच्या ट्विटवर जितेंद्र आव्हाड यांनी उपरोधिकपणे म्हटलं आहे. त्यांनी PMOचे आभार मानले आहेत.

दरम्यान, ट्विटर वर PMOचं हे ट्विट चांगलेच ट्रोल केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

लोकसभेत राजकीय वातावरण तापलं तर बर्फाच्या वर्षावाने ‘दिल्ली’ गारठली!

तुमची 55 वर्षे आणि माझे 55 महिने करा तुलना, पंतप्रधान मोदींचं काँग्रेसला आव्हान

काँग्रेसला अंहकारामुळं 400 जागांवरून 40 वर यावं लागलं- नरेंद्र मोदी

-मी माझ्या मर्यादेतच आहे- नरेंद्र मोदी

मोदींना वाईट म्हणा, भाजपला वाईट म्हणा पण देशाला वाईट म्हणू नका- नरेंद्र मोदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या