Top News विधानसभा निवडणूक 2019

…म्हणून पवार साहेबांना बाप म्हणत असल्याचा मला अभिमान- जितेंद्र आव्हाड

मुंबई | दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांची भेट झाली होती. यावेळी मोदींनी मला भाजपसोबत येण्याची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट पवारांनी केला होता. मात्र मी त्यांची ऑफर नाकारली असंही पवार सांगितलं होतं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे.

पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एकत्र काम करण्याची ऑफर दिली होती. पण शरद पवारांनी ती फेटाळली. त्यामुळे शरद पवार साहेबांना बाप म्हणतो ह्याचा मला अभिमान आहे’, असं ट्विट आव्हाडांनी केलं आहे.

मोदींसोबत दिल्लीत झालेल्या भेटीत काय झालं याचा खुलासा पवारांनी केला आहे. शेतीची चर्चा झाल्यानंतर मी उठायला निघालो तेव्हा मोदींनी मला थांबवून म्हटलं, आपण एकत्र येऊन काम केलं तर मला आनंद होईल.., असं पवारांनी सांगितलं होतं.

दरम्यान, शरद पवार यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत पवारांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या