बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

निर्मलाआक्का, इथं संवेदना अन् माणुसकी व्यक्त होते; आव्हाडांकडून सीतारामन यांचा समाचार

मुंबई |  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रस्त्याने चालत जाणाऱ्या मजुरांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी राहुल गांधींवर टीका केली होती. त्या टीकेचा राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला आहे.

स्थलांतरित मजुरांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या बाजूला बसणे, गप्पा मारणे, त्यांच्या बरोबर चालणे… राहुल गांधींची ड्रामाबाजी आहे असे निर्मलाअक्कांचे म्हणणे आहे, जर माणुसकी आणि संवेदना व्यक्त करणे ड्रामा बाजी आहे तर मग हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे माणुसकी इथे व्यक्त होतेच, अशा शब्दात आव्हाडांनी सीतारामन यांचा समाचार घेतला.

रस्त्यावर बसून मजुरांशी गप्पा मारण्याची ही वेळ आहे का? असा सवाल अर्थमंत्र्यांनी राहुल गांधी यांना केला आहे. रस्त्यावर बसून गप्पा मारण्यापेक्षा त्यांच्या सुटकेस आणि बाळाला हातात उचलून घेऊन चालत गप्पा मारायला हव्या होत्या. फक्त गप्पा मारणं हे नाटक नाही का?, अशा शब्दात अर्थमंत्र्यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं होतं.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी देखील सीतारामन यांचा समाचार घेतला आहे. निर्मला सीतारामजी, राहुल गांधी मजुरांशी फक्त बोलून थांबले नाहीत तर त्यांच्या घरी जाण्याची देखील त्यांनी सोय केली. आम्हाला तुमच्या पक्षासारखी पी.आर. स्टंटची गरज पडत नाही, अशा शब्दात थोरात यांनी अर्थमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

“आम्ही मोदींसारखे ड्रामेबाज नाही, जेव्हा मत हवं असतं तेव्हा ते मजुरांचे पाय धुतात”

उद्धवा अजब तुझे सरकार, गजब तुझा कारभार; सोमय्यांचा पुन्हा राज्य सरकारवर निशाणा

महत्वाच्या बातम्या-

ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांचं कोरोनामुळे निधन

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांना संजय राऊत यांचा सल्ला, म्हणाले…

तज्ज्ञ अहवाल आता आवरा आणि इशाऱ्यांचे नगारे देणे थांबवा; संजय राऊत संतापले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More