महाराष्ट्र मुंबई राजकारण

बाबासाहेब बघताय ना… गोगोईंच्या राज्यसभा नियुक्तीवर आव्हाडांचा निशाणा

मुंबई |  देशाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली. त्यांच्या नियुक्तीनंतर आता विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गोगोईंवर निशाणा साधला आहे.

राज्यसभेत जायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बना … आणि सत्ताधारी खुश होतील असे निर्णय द्या आणि राज्यसभेवर जा, असं ट्वीट करत आव्हाडांनी गोगोईंना टोला लगावला आहे.

बाबासाहेब बघता आहात ना … वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि न्यायाधीश ह्यांना निवृत्ती नंतर 10 वर्ष राजकारणात प्रवेश बंदी ही काळाची गरज आहे तरच लोकशाही वाचेल, असंही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

एप्रिल २०१९ मध्ये तत्कालीन मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने निवृत्त न्यायाधीशांना महत्त्वाच्या जागांवर नेमल्याने न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य धोक्यात येते असे म्हटले होते, अशी आठवणही आव्हाड यांनी करून दिली आहे.

दरम्यान, गोगोईंनी 3 ऑक्टोबर 2018 रोजी सरन्यायाधीश पदाचा कार्यभार स्वीकारला होता. जवळपास 13 महिने त्यांनी सरन्यायाधीशपदाची जबाबदारी सांभाळली. गेल्यावर्षी 17 नोव्हेंबरला रंजन गोगोई सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले होते. गोगोई यांनी आपल्या कार्यकाळात अयोध्या खटला आणि शबरीमाला मंदिरासारख्या महत्त्वपूर्ण प्रकरणांचा निकाल दिला होता.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीसोबतचं नातं तोडाव नाहीतर… – रामदास आठवले

कोरोनाचा महाराष्ट्रात पहिला तर देशात तिसरा बळी!

महत्वाच्या बातम्या-

पहिल्यांचा शपथ घेऊ द्या मग सांगतो मी का राज्यसभेवर जातोय…- रंजन गोगोई

रंजन गोगोईंची राज्यसभेवर वर्णी म्हणजे मोदींनी पर्रिकरांचा केलेला अनादर- काँग्रेस

“कोणतीही लक्षण नाहीत तरी रिपोर्ट पॉझिटीव्ह आला; दुर्लक्ष करू नका घरीच बसा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या