बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवारांवर टीका केल्याशिवाय यांना हेडलाईन मिळत नाही”

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेच्या (MNS) गुडीपाडवा मेळाव्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर जोरदार निशाणा साधला. तर गुडीपाडवा मेळाव्यात संबोधित करताना राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही टीकेची झोड उठवली.

राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज ठाकरेंच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे.

तुमचं प्रेम, तुमच्या डोक्यातील घृणा हे आजपर्यंत विशिष्ट कृतीतून कायमच दिसलं आहे. तुमची मानसिकता काय आहे हे महाराष्ट्राला उशिरा कळालं आहे. शरद पवारांवर टीका केल्याशिवाय यांना हेडलाईन मिळत नाही. हे गणित ठेवूनच लोक भाषण करतात, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

दरम्यान, जो माणूस एका प्रगतशील विचारांचा वाटायचा. माझ्याकडे महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट आहे. आपल्याकडे फॉर्मुला आहे महाराष्ट्राला कसं पुढं घेऊन जायचं हे सांगणारे राज ठाकरे आज मशिदीच्या बाहेर पोरांना बसवतात ही प्रगती आहे की अधोगती, अशी टीका देखील जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“भाजपला आता आणखी एक मनोरंजन करणारा मित्रपक्ष मिळाला”

“राज ठाकरे यांच्या इतका सरडा पण रंग बदलत नाही”

“पवार साहेब, उतार वयात विस्मरणाचा रोग जडला की कोलांट्या मारण्याची सवय?”

Raj Thackeray: “जो माणूस इतिहास विसरला, त्याच्या पायाखालचा भूगोल सटकला”

“हिंदू म्हणून आपण एक कधी होणार?”, राज ठाकरेंचा सवाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More