मुंबई | प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनात महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालच्या चित्ररथाला केंद्र सरकारने परवानगी नाकारल्याची माहिती समोर येताच राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारल्यावरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
केंद्रातील माणसं खोट्या मनोवृत्तीची आहेत. राज्यात त्यांची सत्ता नाही, विरोधकांची सत्ता आहे म्हणून त्यांनी चित्ररथ नाकारला. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे यातून केंद्र सरकारचा कोतेपणा दिसला, अशा शब्दात आव्हाडांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
आम्ही 26 जानेवारीला जेव्हा चित्ररथ नेतो, तेव्हा त्यातून महाराष्ट्राची विचारधारा नेत असतो. तुम्ही महाराष्ट्राची विचारधारा अडवू शकत नाही. तुम्हाला पुरोगामी महाराष्ट्राचे विचार कधीही अडवता येणार नाहीत, असं म्हणत आव्हाडांनी विरोधकांना खडसावलं आहे.
देशाला इतक्या लहान मनोवृत्तीचे पंतप्रधान मिळाले. त्यांनी राज्यातील सत्ता गेली तर इतकं मनाला लावून घेतलं की महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारला, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्रासोबत पश्चिम बंगालचा चित्ररथ यंदाच्या २६ जानेवारीच्या संचलनात नाकारला आहे, ज्या राज्यांची ऐतिहासिक,सामाजिक, सांस्कृतिक प्रगल्भता इतर राज्यांहून सरस असताना हा निर्णय म्हणजे मोदीजी आणि अमित शहा द्वेषातून घेतलेला निर्णय. @Awhadspeaks @MamataOfficial @supriya_sule pic.twitter.com/QvSINKexA6
— NCP Thane (@ThaneNCP) January 2, 2020
महत्वाच्या बातम्या-
एकनाथ खडसे भविष्यात दिल्लीत दिसणार; भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य! – https://t.co/1Bi018YAKq @EknathKhadseBJP @BJP4Maharashtra @SMungantiwar #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 2, 2020
चित्ररथ नाकारणे हा महाराष्ट्राच्या मातीचा अपमान आहे- रुपाली चाकणकर https://t.co/jH9JcbCjJ7 @ChakankarSpeaks @NCPspeaks #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 2, 2020
अब्दुल सत्तारांचे दाऊदशी संबंध?? ‘सामना’तील ‘ती’ बातमी व्हायरल! – https://t.co/auJmPQd26s @ShivSena @uddhavthackeray #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 2, 2020
Comments are closed.