मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर हे शिवसेनेत जाणार असल्याच्या वृत्तावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली होती.
शरद पवार साहेबांनी ज्यांना पुत्रवत प्रेम दिलं ते कधीच गद्दारी करणार नाही, असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. मात्र अहिरांचा पक्षप्रवेश निश्चित झाल्याचं कळताच ते ट्विट त्यांनी डिलीट केलं आहे.
सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा तथ्यहिन आहेत. ते शिवसेनेत जाऊच शकत नाहीत, असा विश्वास आव्हाडांनी व्यक्त केला होता.
सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशाच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असंही आव्हाडांनी सांगितलं होतं. मात्र सचिन आहिरांनी या सर्व अफवांना पूर्णविराम देत अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे.
@AhirsachinAhir हे पक्ष सोडणार ही अफवा आहे
ज्यांना पक्षानी खास करून शरद पवार साहेबानी पुत्रव्रत प्रेम दिले ते कधीच गद्दारी करणार नाहीत
अफवांवर विश्वास ठेवू नका— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 25, 2019
महत्त्वाच्या बातम्या-
मुलीला वेश्याव्यवसायात ढकलण्यासाठी वडील, भावाने दिले सिगारेटचे चटके
-राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा
-आजपर्यंतचा सर्वात जबरदस्त फिल्डर असलेला ‘हा’ खेळाडू होणार भारताचा फिल्डिंग कोच?
‘राष्ट्रवादी’ला मोठा धक्का; सचिन अहिर शिवसेनेच्या वाटेवर?
-वर्ल्डकप जिंकणाऱ्या इंग्लंडची इज्जत धुळीला; आयर्लंडविरुद्ध २ आकडी धावसंख्येत सर्वबाद
Comments are closed.