बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमित शहा म्हणजे ब्रह्मदेव नव्हे- जितेंद्र आव्हाड

मुंबई | महाविकास आघाडीला अपवित्र युती म्हणणारे अमित शहा म्हणजे काही ब्रह्मदेव नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी निशाणा साधला.

काश्मीरमध्ये तुम्ही मेहबुबा मुफ्ती यांच्याशी युती केली. तेव्हा तुम्ही कुठल्या पवित्र संबंधात जोडले गेले होता?, असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी शहा यांना लगावला. त्यासोबतच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी कुंभमेळ्यात तुमच्याप्रमाणे अंघोळ करून कोरोनाचा संसर्ग फैलावण्यास मदत केली नाही. आता केवळ कुंभमेळ्यात अंघोळ न केल्यामुळे आम्हाला अपवित्र ठरवले जात असेल तर आम्हाला ते चालेल, असं आव्हाड म्हणाले.

शिवसेनेने आमच्यासोबत निवडणूक लढवली होती. शिवसेना हा आमचा छोटा मित्र पक्ष होता. त्यांनी आम्हाला मुख्यमंत्रीपदावर दावा करण्याची मोकळीक दिली होती. हे सरकार त्यांच्या ओझ्यानेच पडेल, असं अमित शहा यांनी म्हटलं होतं. या टीकेला आव्हाडांनी आपलं प्रत्युत्तर दिलं.

दरम्यान, आपण बोलण्यापेक्षा महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा जो जबरदस्तीने कमी केला आहे तो जरा व्यवस्थित करा. तसेच महाराष्ट्र्राला रेमडेसिवीर देण्याबाबत जे राजकारण केले गेले आहे ते जरा बंद करा. कमी लोकसंख्या असणाऱ्या गुजरातला व्हेंटिलेटर दिले. आम्हाला दुपटीने देऊ नका. मात्र गरज आहे तेवढी तरी द्या, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

भाजपच्या ‘या’ दोन नेत्यांचं पितळ उघडं पाडणार- नवाब मलिक

महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागू होणार, मुख्यमंत्री करणार घोषणा

स्मशानभूमीत रांगा अन् फुटपाथवरच पेटल्या चिता; ‘या’ शहरातील व्हिडिओनं हाहाकार, पाहा Video

मोठी बातमी! दहावीच्या परीक्षा रद्द, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More