बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ओबींसींबाबत जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…

मुंबई | राजकीय वर्तुळात नेहमीच आरोप-प्रत्यारोप पहायला मिळतात. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांच्या वक्व्यावरुन राजकारण पेटल्याचं पहायला मिळत आहे. आव्हाडांच्या वक्तव्याविरोधात भाजप (BJP)आक्रमक झालं असून जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी काल क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ओबींसींविषयी चुकीचं वक्त्वय केलं त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ पहायला मिळत आहे.

ओबीसींवर माझा फार काही विश्वास नाही, कारण जेव्हा मंडळ आयोग आलं तेव्हा मंडळ आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं, पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात नव्हते, कारण ओबीसींना लढायचं नसतं, असा घणाघात आव्हाडांनी ओबीसींवर केलेला पहायला मिळाला.

पुढे आव्हाड म्हणाले की, ओबीसींवरती ब्राह्मण्यवादाचा इतका पगडा बसलाय. आपण श्रेष्ठ आहोत. पण त्यांना हे माहिती नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला पणजोबाला देवळात सुद्धा येऊ द्यायचे नाहीत. हे सगळे विसरलेत. मात्र आता आरक्षणाच्या निमित्ताने का होईना पुढे येत आहेत.

थोडक्यात बातम्या – 

धक्कादायक! लस घेतलेल्या ‘इतक्या’ टक्के नागरिकांना कोरोनाची लागण

नितेश राणेंना मोठा दिलासा; तुर्तास अटक होणार नाही

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण

मुंबईत लागणार लॉकडाऊन?; आयुक्तांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

खुल्लम खुल्ला प्यार!, औरंगाबादच्या रस्त्यावरील तरुण-तरुणीचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More