बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जितेंद्र आव्हाडांच्या कन्येचं दुसऱ्यांदा लग्न, पाहा लग्नाचा शानदार व्हिडीओ

मुंबई | सध्या राजकीय क्षेत्रातील अनेक मंत्र्याच्या घरात लग्नाचे वारे वाहत आहेत. नुकताच संजय राऊत यांच्या कन्येचा विवाह (Marriage) पार पडला, याशिवाय जितेंद्र आव्हाड, लालूप्रसाद यादव यांच्याही घरी लग्नसोहळे पार पडले. मात्र, त्यात सर्वात जास्त चर्चा झाली ती, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या कन्येच्या म्हणजेच नताशाच्या विवाहाची. नताशाचा विवाह रजिस्टर पद्धतीने झाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा नताशाने ख्रिश्चन पद्धतीने विवाह (christian Marriage) केला आहे.

जितेंद्र आव्हाड (Housing Minister Jitendra Awhad) यांनी स्वत: ट्विटरवर व्हिडीओ शेअर करून ही माहिती दिली आहे. “काही विकृतांच्या माहितीसाठी एलेन हा ख्रिश्चन आहे. म्हणून ख्रिश्चन पद्धतीन लग्न होत आहे. त्याच्या कुटुंबियांनी आणि त्यानेही लग्नासाठी गोवा हे ठिकाण निवडलं. एलेन आणि नताशा हे स्वतंत्र व्यक्तीमत्त्व असून ते त्यांचे निर्णय घेऊ शकतात.” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

नताशा आणि एलेन यांचा विवाह गोव्यात पार पडला. गोव्यातील ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये हा विवाह पार पडला असून जितेंद्र आव्हाडांनी ट्विटरवर सर्व व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यांनी ट्विटमध्ये प्रत्येक धर्माचे आपले विधी असतात. एलेन हा ख्रिश्चन असल्याने त्याचे स्वत:चे काही धार्मिक विधी आहेत आणि मी ते रोखणारा कोणीच नाही, असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नताशा आणि एलेन यांनी 7 डिसेंबर रोजी राहत्या घरी लग्न केलं होतं. या दोघांनी अतिशय साध्या पद्धतीने रजिस्टर विवाह केला होता. साध्या पद्धतीने लग्न केल्याने जितेंद्र आव्हाडांचं सर्वत्र कौतुकही झालं होत.

 

थोडक्यात बातम्या-

चिंताजनक! Omicron संदर्भात एम्सनं दिला ‘हा’ महत्त्वाचा इशारा

“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा पक्ष या देशात ठेवायचा की नाही…”

‘पालक म्हणून आम्ही आमच्या मुलीला…’; अनुष्का शर्माची पोस्ट व्हायरल

“मी नुसत्या बढाया मारत नाही, शिवसेनेचा धुव्वा उडवणारच”

अखेर ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर गुलाबराव पाटलांनी मागितली माफी, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More